सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
वार्षिक बाजार मूल्य दर तक्ते दरवर्षी एक एप्रिल ल प्रसिद्ध होत असतात तर मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर २९ मार्च ते ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या कालावधीत भोर दुय्यम निबंध कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती भोरचे दुय्यम निबंधक शेखर कुलकर्णी यांनी दिली.
दुय्यम निबंधक कुलकर्णी पुढे म्हणाले मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार मार्च महिन्यातील तीन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये चालू राहणार.वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिलला प्रसिध्द होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते.तसेच महत्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे.हे लक्षात घेवून आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने आर्थिक वर्षअखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्यात येत आहे.