Bhor News l भोरमध्ये बांधकाम व्यावसायात गुंतवणुकीबाबत व्याख्यान संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
रोटरी क्लब, भोर राजगड व प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अमित एंटरप्रायझेस हौसिंग लिमीटेड पुणे यांच्या संयुक्त विदयमाने शुक्रवार दि.२१ भोर येथे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीबाबत महारेराचे समन्वय अधिकारी (कौन्सिलिएटर) शिरीष मुळेकर यांच्या व्याख्यान झाले. व्याख्यानात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक फायदयाची कशी आहे, तसेच महारेरा कायदा ग्राहकांना कशाप्रकारचे संरक्षण मिळवुन देतो तसेच गुंतवणुकदारांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक करताना कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्यात आली. 
    कार्यक्रमामध्ये उपस्थितांच्या गुंतवणुकीसंदर्भातील शंकांचे निरसनही करण्यात आले. तसेच अमित एंटरप्रायझेस हौसिंग लिमीटेड यांचे आंबेगांव मधील बहुचर्चित गृहप्रकल्प अॅस्टोनिया रॉयल यांच्या संदर्भात माहिती देण्यात आली. खास भोर करांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क यावर ३० मार्च २०२५ पर्यंत सवलत जाहीर करण्यात आली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार राजेंद्र नजन माजी नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे रोटरी क्लब अध्यक्षा डॉ. रूपाली म्हेत्रे, डॉ. योगेंद्र आगटे, महेंद्र ओसवाल, अनिल पवार,  सागर सोंडकर, रवींद्र हर्नसकर, रोटरी क्लबचे सर्व सदस्य, विविध संघटनेचे अध्यक्ष तसेच भोर परिसरातील राजकिय, वैदयकीय, शैक्षणिक, व्यापारी व सामाजिक क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Tags
To Top