Satara News l बांधकाम परवान्यासाठी पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह चौघे जाळ्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
कराड येथील पालिकेतून बदली झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौघेजण लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. 
           बांधकाम परवान्यासाठी दहा लाखांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना दोघांना साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दि. २४ रोजी रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यासह चौघांवर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
         मुख्याधिकारी शंकर खंदारे (रा. ककराड, मूळ रा. सातारा), सहायक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. संकल्प प्राइड, देसाईनगर, कऱ्हाड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफिक कयूम शेख (रा. कार्वेनाका, सुमंगलनगर, कऱ्हाड) व अजिंक्य अनिल देव, अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.
To Top