सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वर्षानुवर्षीच्या परंपरेनुसार पुरुषांच्या हस्तेच गुढी उभारली जात असल्याचे आपण पाहत आलो असलो तरी भोर शहरात त्याला फाटा देऊन उन्नती महिला प्रतिष्ठान भोर यांच्या वतीने गंगुताईसाहेब पंतसचिव वाचनालय भोर येथे पोलीस उपनिरीक्षक शिला खोत ,हावलदार संगीता टापरे,डाॅ.संगिता खोकले यांच्या हस्ते गुढी उभारली.
यावेळी प्रतिष्ठानच्या महिलांनी भक्ती शक्ती आणि एकात्मतेचा मार्ग स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करू, समाजातील एकता वृद्धिंगत व्हावी ,संस्काराचे बीज रुजावे आणि आपल्या परंपरा जपल्या जाव्यात यासाठी भरीव योगदान देऊ,महिलांची सुरक्षा जपत त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास व्हावा तसेच आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करून त्या स्वावलंबी बनाव्यात यासाठी पुढाकार घेऊ तर पर्यावरण आणि विकास यांचा समतोल सादर सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी इतरांना प्रोत्साहन देऊ आणि स्वतःही त्यानुसार वागू असा संकल्प केला गेला.तर डॉ.खोकले यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान केला गेला.अध्यक्ष सीमा तनपुरे, रेखा धरू,मेघा आंबवले,सुजाता धुमाळ,भाग्यश्री वरटे, आश्विनी धोंडे,बाळासाहेब देशमाने,रमेश कोठावळे उपस्थित होते.