सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
मुर्टी ता. बारामती येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना रविवार दि. २० रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान घडला. आण्णा किसन गोफणे वय ४८ रा. मोराळवाडी ता.
बारामती असे अत्याचार करणाऱ्याचे नाव आहे.
मुर्टी येथील शिवशेतात नांगरटीचे काम सुरू होते दुपारच्या वेळी पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला ही घटना तिचा ९ वर्षाच्या भावाने पाहिली जवळच असलेल्या नातेवाईकांच्या घरी पळत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीचे वडील शेतात मजुरीचे काम करीत होते.
काही वेळातच धावत सर्वजण घटनास्थळी आले. काही वेळातच रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी आण्णा गोफणे याला ताब्यात घेतले. अॅट्रॉसिटीसह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी दिली.