Bhor News l संतोष म्हस्के l चोरट्यांना आता देवाचीही भीती उरली नाही : नेरेत ग्रामदैवताचा एक किलो चांदीचा मुखवटा चोरीला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
चोरट्यांकडून घर, दुकाने फोडून चोऱ्या केल्याचे प्रकार बहुतांशी घडत होते. मात्र सध्या चोरट्यांना देवाचीही भीती उरली नसल्याने देवळांकडे मोर्चा वळवला असतानाच विसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर येथील ग्रामदैवत बालसिद्धनाथाचा १ किलो चांदीचा मुखवटा रविवार दि.२० रोजी रात्री चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. 
            रविवार दि.२० रात्री बारा वाजेपर्यंत देवाचा मुखवटा देवळातील घाबऱ्यात होता.सकाळी मंदिर साफसफाई करण्यास तसेच देवाची पूजा करण्यास गेले असता देवाचा चांदीचा ३० ते ४० हजार रुपयांचा मुखवटा गाभाऱ्यातून चोरीला गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.तात्काळ नेरे ता.भोर येथील स्थानिक नागरिकांनी भोर पोलिसांना याची माहिती दिली असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
Tags
To Top