सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य, व प्रगतशील शेतकरी सोमनाथ(बाळासाहेब) बबनराव सावंत (वय ५७) यांचे अपघाताने दु:खद निधन झाले आहे.
ते काल त्यांच्या शेतामध्ये ऊस भिजवण्यासाठी गेलेले होते ऊस भिजवून झाल्यानंतर हातपाय तोंड धुण्यासाठी विहिरीच्या कठाड्यावरती उभे असताना विहिरीमध्ये घसरून पडल्यामुळे शरीराला दुखापत झालेली त्यामुळे त्यांचा पाण्यामध्ये बुडून अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये राजकीय, वारकरी संप्रदाय व सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहून काम केलेले आहे तसेच ते वाघळवाडी ग्रामपंचायतचे १० वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज पाहिलेले आहे त्यांचे वडील गावचे माजी सरपंच कै बबनराव सावंत हे होते त्यांचाच ते राजकीय सामाजिक वारसा पुढे चालवत होतो. वाघळवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच नंदा सकुंडे, जालिंदर सावंत व हेमंत सावंत यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या मागे आई,पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे