वेल्हे l शिवप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या : दसवडकर : तीव्र 'उपोषण आणि जनआंदोलनाचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
शिवप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या! व अनधिकृत मशिदींवर कारवाई करा, अन्यथा तहसील कार्यालया समोर तीव्र 'उपोषण आणि जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिला आहे.
             याबाबत संतोष दसवडकर म्हणाले की 
"राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मेघडंबरी असणे हे फक्त योग्यच नव्हे, तर अभिमानाची बाब आहे. मात्र, जर प्रशासनाला हा पुतळा 'अनधिकृत' वाटत असेल, तर मग वेल्हे तालुक्यातील अनधिकृत मशीदी, यांच्यावरही तोच निकष आणि तीच तत्परता का नाही? दाखवत "वेल्हे तालुक्यातील अनधिकृत मशिदींवर कारवाई करा, शिवप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या! तसेच पुरातत्व विभागातील चुकीचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा! ही केवळ मागणी नाही, तर इशारा आहे! जर प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर मनसे वेल्हे तहसील कार्यालयासमोर तीव्र उपोषण आणि जनआंदोलन करेल." छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! हा लढा केवळ पुतळ्यासाठी नाही, तर स्वाभिमानासाठी आहे! असल्याचे - संतोष दसवडकर यांनी सांगितले.
To Top