सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुणे : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेची (स्पुक्टो), सर्वसाधारण सभा रविवारी (२७ एप्रिल) कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे. येथे पार पडली.
या सभेत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला त्यामध्ये शासनाची धोरणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठाचे कामकाज यावर सविस्तर चर्चा झाली. उच्च शिक्षणातील अपप्रवृत्ती विरोधी आपणास संघर्ष करावा लागणार असून त्यात संघटनेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यादृष्टीने नूतन कार्यकारणीस काम करावे लागणार आहे असे आवाहन डाॅ. एस.पी.लवांडे सर यांनी केले. याप्रसंगी प्रा. मगन ताटे , डाॅ. के.एल.गिरमकर , प्रा. व्हि.एम. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संघटनेची २०२५-२६ या कालावधीसाठीची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांडे आणि निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. मगन ताटे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणेः
अध्यक्ष-
प्रा. प्रकाश वाळुंज
श्री.ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवास, अहिल्यानगर.
सरचिटणीस
डाॅ. प्रवीण ताटे देशमुख
मु.सा.काकडे महाविद्यालय, सोमश्वरनगर, ता. बारामती.
उपाध्यक्ष
१. डाॅ. अर्जुन नेरकर
एम.एस.जी. महाविद्यालय, मालेगाव , कॅम्प, मालेगाव ,
जि. नाशिक.
२. प्रा. डाॅ. शिवाजी भोसले
सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे.
सहसचिव
१. प्रा. प्रदीप मुटकुळे
न्यू कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, अहिल्यानगर
२. डाॅ. अरविंद पाटील
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चांदवड, जि. नाशिक.
खजिनदार
प्रा. सतीश ठाकरे
के.आर.ए. महाविद्यालय, देवळा ,जि. नाशिक.
ताटे देशमुख यांचे दोन ग्रंथ व ४८ संशोधन पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवरील आदर्श प्राध्यापक पुरस्कारानेही ते सन्मानीत आहेत.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीशभैय्या काकडे देशमुख, श्री. अभिजितभैय्या काकडे देशमुख, प्राचार्य डाॅ. देविदास वायदंडे , सचिव श्री.सतीश लकडे. एम.फुक्टो चे अध्यक्ष डाॅ. एस.पी.लवांडे, डाॅ. के.एल.गिरमकर, प्रा.मगन ताटे, डाॅ. व्हि.एम शिंदे व डाॅ. रमेश गायकवाड यांच्यासह राज्यभरातील प्राध्यापकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.