सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वरंधा घाटातील शिरगाव ( ता. भोर ) हद्दीत डोक्याची बाजू ठेचून व हात पाय बांधलेल्या अनोळखी मृत्यू सापडल्या असल्याचे आढळून आल्यावर भोर पोलिसांनी गुन्हाचा तपास तत्काळ आरोपी अटक केली. पुढील तपास भोर पोलिस करत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी पोलीस पाटील सुधीर दिघे यांनी केलेल्या तक्रारीवरून शिरगाव (ता. भोर) येथे शुक्रवार ( दि. २५) हात पाय बांधलेले व डोक्याची बाजु ठेचुन डोक व तोंड नाहीसे केलेली अनोखा मृत्यूदेह सापडला. पोलिसांनी मयताची ओळख पटविण्यासाठी तपास यादी तयार करुन शोध घेण्यास सुरुवात करुन मयताचे नाव संतोष उर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर, (वय ४०)(रा. सोनल हाईटस् बि विंग प्लॅट नं. ०४ वडगाव बुा, ता. हवेली जि. पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले . पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर , पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण विभागाने संतोष भिकु पिसाळ (वय ४२, रा. साई प्लॅनेट बिल्डींग प्लॅट न.२०४ वडगाव बुा, ता. हवेली जि.पुणे), अनिकेत चंद्रकांत पिसाळ, (वय-२९ रा. वेताळनगर अनंत सृष्टी बिल्डींग, प्लॅट नं.४०३ आंबेगाव खा ता. हवेली जि.पुणे,) दोघे ही मुळ रा. रांजे (ता. भोर ) यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी जुन्या भांडणाचे कारणांवरून प्रमोद पासलकर यांचा खून केला असल्याचा गुन्हा कबुल केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार हे करीत आहेत.