सुपे परगणा l सुप्याची महाराष्ट्र बँक म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी 'आओ जावो घर तुम्हारा' : भोंगळ कारभारामुळे ग्राहक त्रस्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील राष्ट्रीयकृत असलेल्या बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महाबॅंकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्राहकवर्गाने व्यक्त केले आहे. 
        शुक्रवारी ( दि. २५ ) येथील बॅंकेचे नेहमीप्रमाने दैनंदिन कामकाज सुरु होणे आवश्यक होते. मात्र येथील मुख्य व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक गैरहजर असल्याने दैनंदिन व्यवहार शुन्य झाले. त्यामुळे बॅंकेकडे दिवसभर हेलपाटे मारुन ग्राहकवर्गाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. येथील शाखेचे पुर्ण दिवस कामकाज बंद राहिले. मात्र त्याचा फटका ग्राहकवर्गाला बसला. मागिल काही महिण्यापुर्वी येथील येथील रोखपाल दुपारपर्यंत बॅंकेकडे येण्यास उशीर झाला. त्यावेळीही कोणतेच व्यवहार झाले नाही. सहाय्यक व्यवस्थपकाकडे विचारणा केली असता त्यांची रेल्वे उशिरा येत असल्याने व्यवहार होत नसल्याचे सांगण्यात आले. 
         दररोज बॅंकेंच्या कामकाजाची बंदची वेळ झाली, तर पाच मिनीटे त्या ग्राहकाला उशीर झाला असेल तर व्यवहार करुन देत नाहीत. काल ( शुक्रवारी ) व्यवहार दिवसभर बंद राहिल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्राहकवर्ग उपस्थित करीत आहेत. येथील शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक अचानक  गैरहजर राहिल्याने हा प्रकार घडला असल्याचे येथील काही खातेदारांनी बोलताना सांगितले. हे व्यवस्थापक ग्राहकांशी जुळवुन घेत नाही. तसेच काही माहिती विचारली तर उद्दटपणे उत्तरे देतात असेही ग्राहकांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना सांगितले. 
            ....................................
To Top