Bhor Breaking l डोक्याचा स्कार्फ मळणी यंत्रात अडकला...आणि डोकं ओढलं गेलं...! २४ वर्षीय महिलेचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
डोक्याला बांधलेला स्कार्प मळणी यंत्रात ओडला जाऊन महिलेचे डोके यंत्रात अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केंजळ ता.भोर येथे शनिवार दि.२६ घडली. सावित्रा पांडुरंग गायकवाड (वय २४ ) असे मयत महिलेचे नाव आहे. याची खबर पती पांडुरंग गायकव (वय ३८, सध्या रा. केंजळ, ता. भोर, मूळ रा.आंतरावली, ता. गणसांगवी, जि. जालना) यांनी राजगड पोलीसात दिली.
    राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला ही आपल्या कुटुंबीयांसोबत गेली ५ वर्ष केंजळ (ता. भोर) येथील मयुर चव्हाण यांच्या शेतातील कामे करून उपजीविका करतात.शनिवार दि.सायंकाळी मयत महिला व त्यांचे पती यांनी शेतातील बाजरी भरडण्यासाठी नितीन बाठे यांचे मळणी यंत्र बोलावले. त्यांनतर काही वेळाने बाजरी भरडताना मशिनमध्ये पडलेली बाजरीचे कनसे उचलत असताना मयत महिलेच्या डोक्यावर बांधलेला स्कार्प व डोक्याचे केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रॉडला अडकल्याने तिचे डोकेही फिरत्या रॉडमध्ये अडकले. या दुर्दैवी घटनेत अक्षरशः महिलेचे शीर धडावेगळे होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला.राजगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या बाबतचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
                                        
To Top