सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर आणि खंडाळा तालुक्याच्या हद्दीवरील गुठाळे ता.
खंडाळा गावात एका २३ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ओमकार सुनील महांगरे असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत ओमकार हा रविवारी दि. १३ विंग ता. खंडाळा फाट्यावर आला असता त्याला तब्येतीत बिघाड झाल्यासारखे जाणवू लागले.यांनतर तो पुन्हा आपल्या राहत्या घरी गुठाळे येथे गेला.घरातील व्यक्तींनी ओमकारला लगेचच रिक्षातून भोर येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना राजेवाडी गावच्या हद्दीत त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
प्रसिद्ध डीजे चालक म्हणून परिसरात ओमकरची ओळख होती. गुठाळे गावच्या सुरू असणाऱ्या यात्रोत्सव दरम्यान झालेल्या या घटनेमुळे ओमकारच्या कुटुंबीयांवर व गुठाळे गावावर शोककळा पसरली आहे. ओमकरच्या पश्चात त्याचे आई, वडील, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे. एका उमद्या तरुणाचा अल्प वयोमान असताना मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.