Khandala Breaking l टॅंकरमधून गॅस थेट सिलेंडरमध्ये : खंबाटकी घाटात आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश... १३ जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा :  प्रतिनिधी  
पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटातील बेंगरूटवाडी हद्दीमध्ये असणाऱ्या गुरुनानक पंजाबी धाबाच्या जागेमध्ये गॅस टँकरचालकांना हाताशी धरत अवैधरित्या गॅस टँकरमधून सिलेंडरमध्ये भरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाला व खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धडक कारवाई करीत यश मिळविले. 
          गॅस टँकर अवैध साठवणूक केलेले सिलेंडर व गॅस टँकरमधून सिलेंडरमध्ये भरण्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक साहित्यासह तब्बल 71 लाख 7 हजार 953 असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये जागा मालक व खंडाळा नगरपंचायतचा माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक पंकज गायकवाड याच्यासह या अवैध धंद्याच्या मालकासहित 13 जणांविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आला. खंडाळा तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि,खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाट पायथ्याशी असणाऱ्या बेंगरूटवाडी गावच्या हद्दीमध्ये गुरूनानक पंजाबी धाबा आहे.याठिकाणी खंडाळा नगरपंचायतचा माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक पंकज गायकवाड याच्या मालकीच्या जागेमध्ये सराईत गुन्हेगार व आंतरराज्य टोळीचा प्रमुख देवराज जानी हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत शासकीय गोदामला गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस टँकर चालकांना हाताशी धरत अवैधरित्या गॅस टँकरमधून सिलेंडरमध्ये बेकायदेशीर गॅस भरून घेत असल्याची माहिती राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाला माहिती मिळाली होती.त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने पथक तयार करीत संबंधित ठिकाणी अचानकपणे छापा टाकला असता त्याठिकाणी गॅस टँकरमधून गॅस सिलेंडरमध्ये अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने गॅस भरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी खंडाळा पोलीसांच्या सहकार्याने 20 लाख रुपये किमतीचा कॅप्सूल टँकर (क्रं-आरजे-51-सीए-4095),13 लाख 9 हजार 932 रुपये किमतीचा 17 हजार 550 किलो ग्रॅम भरलेला गॅस असलेला कॅप्सूल टँकर,24 हजार 681 रुपयांचे टँकरच्या पाईपलाईनला जोडलेले 6 व्यवसायिक गॅस सिलेंडर,3 लाख रुपये किमतीची सुपर कॅरी वाहन(क्रं-एमएच-12-क्यूडब्ल्यू-0953),20 लाख रुपये किमतीचा कॅप्सूल टँकर (क्रं-एमएच-12-एक्सएम-6053),7 लाख 46 हजार 48 रुपये 26 पैसे किमतीचा कॅप्सूल टँकर 17 हजार 580 किलोग्रॅम भरलेला गॅस असलेला टँकर, 4 लाख रुपये किमतीची जीप(क्रं-आरजे-43-जीए-3883), 39 व्यवसायिक गॅस सिलेंडर भरलेली 53 हजार 600 रुपये किमतीची जीप (क्रं-एमएच-12-क्यूडब्ल्यू-0953), 24 व्यवसायिक गॅस सिलेंडर भरलेली 98 हजार 724 रुपये किमतीची जीप(क्रं-आरजे-43-जीए-3883), व्यवसायिक रिकामे गॅस सिलेंडर भरलेली 31 हजार 200 रुपये किमतीची जीप(क्रं-आरजे-43-जीए-3883), 6105 रुपये किमतीचे 2 भरलेले गॅस सिलेंडर,3 हजार 52 रुपये 50 पैसे किमतीचे गॅस सिलेंडर,धाब्याच्या पाठीमागील बाजूस 19 किलो वजनाचे 74 हजार 43 रुपये किमतीचे 18 गॅस सिलेंडर, शौचालयात ठेवलेले 20 हजार 567 रुपये 50 पैसे किमतीचे 5 गॅस सिलेंडर असा एकूण 71 लाख 7 हजार 953 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये गुन्ह्यात वापरलेले 2 कॅप्सूल टँकर,2 जीप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यामध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3,7,8 व दि लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेगूलेशन ऑफ सप्लाय अँन्ड डिस्टीब्युशन ऑर्डर 2000 मधील कलम 2,3,4,5,6 मधील तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी तब्बल 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये व्यवस्थापक हरी ओम सिंग,टँकर चालक मोहम्मद तौफिक,2 टँकर चालक,टँकर ट्रान्स्पोर्टर,अवैध व्यवसाय चालविणारा आंतरराज्य टोळीचा प्रमुख देवराज जानी,जागा मालक व खंडाळा नगरपंचायत माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक पंकज गायकवाड, 2 टँकर मालक, 1 टँकर वाहतूकदार, 2 जीप चालक, 1 जीप मालक असा 13 जणांविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनला खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा अधिकारी स्मिता आगाशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेचा खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे अधिक तपास करीत आहे.
To Top