Indapur News l इंदापूर तालुक्यातील गाव कारभाऱ्यांचे आरक्षण जाहीर : गाव पातळीवर 'किंग मेकर' झाले सक्रिय...!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या गाव कारभारी म्हणून ओळखले जाणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्यात आले. त्यामुळे गावपातळी वरील किंगमेकर सक्रिय झाले असून काही ठिकाणी कारभारी बदला तर काही ठिकाणी युवा कारभारी करा यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 
            यंदा सरपंचपद जनतेतून असल्याने खऱ्या गावपुढाऱ्यांना आपले कर्तृत्व दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पंचायत राज मुळे ग्रामपंचायती ना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गाव गाड्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सरपंचपदासाठी विशेष स्पर्धा सुरू झाली आहे. आरक्षणाच्या सोडती बुधवार दिनांक २३ एप्रिल रोजी इंदापूर येथील वाघ पॅलेस येथे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आल्या. यावेळी संस्कृती देशमुख, यशराज देशमुख तसेच श्रीनिवास देशमुख या लहान मुलांच्या हस्ते सोडती काढण्यात आल्या. त्यांना गटविकास अधिकारी सचिन खुडे, नायब तहसीलदार विजय घुगे, अविनाश डोईफोडे, केतकी कुलकर्णी, राहुल पारेकर आदींचे सहकार्य लाभले. आरक्षण सोडती नंतर ‘कहीं खुशी, कहीं गम, मगर हम नही किसीसे कम असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.
             इंदापूर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० करीता जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी पुणे यांचेकडून आरक्षीत केलेले सरपंच आरक्षण सोडत पुढील प्रमाणे आहे.
१ कालठण नं. २ - अनु. जाती.
२ भाटनिमगाव- अनु. जाती.
३ उध्दट- अनु. जाती स्त्री.
४ तरटगाव- अनु. जाती स्त्री.
५ गोखळी- नागरिकांचा मागास प्रवर्ग.
६ बोराटवाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री.
७ अगोती नं. २- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री.
८ अवसरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री.
९ खोरोची- सर्वसाधारण स्त्री.
१० पवारवाडी- 
सर्वसाधारण स्त्री.
११ शिरसटवाडी- 
सर्वसाधारण स्त्री.
१२ कांदलगांव- 
सर्वसाधारण स्त्री.
१३निरनिमगाव- 
सर्वसाधारण स्त्री.
१४ लुमेवाडी- 
सर्वसाधारण स्त्री
१५ कालठण नं. १- 
सर्वसाधारण.
१६ पंधारवाडी-
सर्वसाधारण.
१७ अगोती नं. १- 
सर्वसाधारण.
१८ वडापूरी-
सर्वसाधारण.
१९ शेटफळ हवेली-
सर्वसाधारण.
२० सुरवड-
सर्वसाधारण.
इंदापूर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० करीता तहसिलदार स्तरावरुन काढलेली सरपंच आरक्षण सोडत पुढील प्रमाणे आहे.
१ जाधववाडी- 
अनुसूचित जाती स्त्री.
२ कचरवाडी ( नि.के.)- 
अनुसूचित जाती.
३ गलांडवाडी नं. २- 
अनुसूचित जाती.
४ कचरवाडी (बा.)- 
अनुसूचित जाती.
५ डाळज नं. ३- 
अनुसूचित जाती स्त्री.
६ करेवाडी- 
अनुसूचित जाती स्त्री.
७ बळपुडी- 
अनुसूचित जाती.
८ तरंगवाडी- 
अनुसूचित जाती स्त्री.
९ दगडवाडी- 
अनुसूचित जाती.
१० झगडेवाडी- 
अनुसूचित जाती स्त्री.
११ लासुर्णे- अनुसूचित जाती स्त्री.
१२ वालंचदागर- 
अनुसूचित जाती स्त्री.
१३ बावडा- 
अनुसूचित जाती.
१४ अजोती- 
अनुसूचित जाती.
१५ सरडेवाडी- 
अनुसूचित जाती स्त्री.
१६ तक्रारवाडी- 
अनूसूचित जमाती स्त्री.
१७ गलांडवाडी नं. १- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
१८ कडबनवाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
१९ जंक्शन- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
२० हिंगणगाव- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
२१ जांब- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
२२ रणमोडवाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
२३ चांडगाव - 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
२४ वरकुटे खुर्द- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री. 
२५ गोंदी / ओझरे- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
२६ भिगवण- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
२७ भादलवाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
२८ पळसदेव- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
२९ माळवाडी-
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
३० कौठळी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
३१ वरकुटे बुद्रुक - 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
३२ घोरपडवाडी - 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
33 लाकडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
३४ कळंब- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
३५ शेटफळगढे- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
३६ बिजवडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
३७ पिंपरी बुद्रुक - 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
३८ सपकळवाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
३९ डाळज नं. २- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
४० निरवांगी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
४१ बेलवाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
४२ हगारवाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
४३ सराफ़वाडी- 
नागरिकांचा मागास प्रवर्ग.
४४ अंथुर्णे- 
सर्वसाधारण स्त्री.
४५ आनंदनगर- 
सर्वसाधारण स्त्री.
४६ सणसर- 
सर्वसाधारण स्त्री.
४७ पोंदवडी- 
सर्वसाधारण स्त्री.
४८ तावशी- 
सर्वसाधारण स्त्री.
४९ काटी- 
सर्वसाधारण स्त्री.
५० निमसाखर- 
सर्वसाधारण स्त्री.
५१ भावडी- 
सर्वसाधारण स्त्री.
५२ टण्णू- 
सर्वसाधारण स्त्री.
५३ अकोले- 
सर्वसाधारण स्त्री.
५४ व्याहाळी- 
सर्वसाधारण स्त्री.
५५ कुरवली- 
सर्वसाधारण स्त्री.
५६ कुंभारगांव- 
सर्वसाधारण स्त्री.
५७ भांडगांव- 
सर्वसाधारण स्त्री.
५८ न्हावी- 
सर्वसाधारण स्त्री.
५९ मानकरवाडी- 
सर्वसाधारण स्त्री.
६० चाकाटी- 
सर्वसाधारण स्त्री.
६१ जाचकवस्ती- 
सर्वसाधारण स्त्री.
६२ पिंपळे- 
सर्वसाधारण स्त्री.
६३ शहा- 
सर्वसाधारण स्त्री.
६४ पिंपरी खुर्द - 
सर्वसाधारण स्त्री.
६५ पडस्थळ - 
सर्वसाधारण स्त्री.
६६ पिठेवाडी- 
सर्वसाधारण स्त्री.
६७ निमगाव केतकी - 
सर्वसाधारण स्त्री.
६८ गोतंडी- 
सर्वसाधारण स्त्री.
६९ लोणी देवकर- सर्वसाधारण स्त्री.
७० म्हसोबाचीवाडी- 
सर्वसाधारण स्त्री.
७१ निरगुडे- 
सर्वसाधारण.
७२ गिरवी- 
सर्वसाधारण.
७३ रेडा- 
सर्वसाधारण.
७४ चिखली- 
सर्वसाधारण.
७५ नरसिंहपूर- 
सर्वसाधारण.
७६ डाळज नं. १- 
सर्वसाधारण.
७७ कळाशी - 
सर्वसाधारण.
७८ भोडणी- 
सर्वसाधारण.
७९ बाभुळगांव- 
सर्वसाधारण.
८० रेडणी- 
सर्वसाधारण.
८१ शेळगांव- 
सर्वसाधारण.
८२
८३ थोरातवाडी- 
सर्वसाधारण.
कळस- सर्वसाधारण
८४ शिंदेवाडी- 
सर्वसाधारण.
८५ बोरी- 
सर्वसाधारण.
८६ सराटी- 
सर्वसाधारण.
८७ निंबोडी- 
सर्वसाधारण.
८८ लाखेवाडी- 
सर्वसाधारण.
८९ मदनवाडी-
सर्वसाधारण.
९० काझड- 
सर्वसाधारण.
९१ भरणेवाडी-
सर्वसाधारण.
९२ गांजेवळण- 
सर्वसाधारण.
९३ वकीलवस्ती- 
सर्वसाधारण.
९४ डिकसळ- 
सर्वसाधारण.
९५ रुई- 
सर्वसाधारण.
९६ पिटकेश्वर- 
सर्वसाधारण.
 इंदापूर तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पैकी ९ ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती, ११ ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती महिला, १५ ग्रामपंचायतीवर नागरिकांचा मागास प्रवर्ग, १६ ग्रामपंचायतीवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ३३ ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण महिला तर ३० ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण सरपंच यांचे राज्य येणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षचिन्हांवर होणार नसल्या तरी यंदा सरपंच पद थेट जनतेतून निवडून येणार असल्याने या निवडणुकांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुका राज्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठेची, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अस्तित्वाची तर जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांच्या शक्तीप्रदर्शनाची ठरणार आहे. या निवडणुकीत युवा पिढी, महिला भगिनी यांचे मतदान महत्वपूर्ण ठरणार असून आता गावागावात पारा पारावर गावचे सरपंच कोण हिच चर्चा प्राधान्याने रंगणार आहे.
To Top