सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी-सोमेश्वरनगर ता. बारामती येथील बाळासो गेनबा शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते ६२ वर्षांचे होते.
त्यांनी गेली २९ वर्ष राज्य शासनाच्या एसटी महामंडळात वाहन चालक म्हणून सेवा केली. सेवेदरम्यान उत्कृष्ट वाहन चालक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्यामागे पत्नी,मुलगा,सून असा परिवार आहे.