वेल्हे l रस्त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून युवकाचे उपोषण सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथील दलीत युवकाचे रस्त्यासाठी उपोषण सुरू झाले असून आजचा दुसरा दिवस आहे.
           मार्गासनी येथे दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2022. 23 मध्ये 2 लाख 65 हजार रुपये मंजूर झाले असून गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता झाला नाही. याबाबत उपोषण कर्ते राहुल रणखांबे यांनी ग्रामपंचायत ला वेळोवेळी पत्रव्यवहार करून रस्त्याचा प्रश्न न सुटल्या मुळे पंचायत समिती कडे धाव घेतली. तरीदेखील रस्त्याच्या कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे उपोषण कर्ते राहुल रणखांबे यांनी  24 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती समोर उपोषणास बसले होते यादरम्यान ग्रामपंचायतीकडून सदर जागेची मोजणी केल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करण्याची आश्वासन दिले त्यामुळे उपोषण राहुल रणखांबे यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर दि 19 मार्च रोजी मोजनिचे काम पूर्ण झाले. तरी देखील ग्रामपंचायत कडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी पुन्हा एकदा राहुल रणखांबे पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे यावेळी राहुल रणखांबे यांनी सांगितले. 
------------------
सदरचे रस्त्याचे कामास सुरुवात उद्या बुधवार दि 2  एप्रिल रोजी सुरुवात करणार आहोत. 
 पल्लवी तेली  
गटविकास अधिकारी पंचायत समिती वेल्हे

To Top