सुपे परगणा l सुप्यात प्रारुप विकास आराखड्याच्या विरोधात आमरण उपोषण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप विकास आराखड्याच्या ( डिपी ) विरोधात आमरण उपोषण सोमवारपासुन ( दि. ३१ ) सुरु करण्यात आले आहे. या डिपी मध्ये काही दुरुत्या तसेच बदल करण्यात यावेत यासंदर्भात १४ मागण्या करण्यात आल्या आहेत. 
       येथील नागरिकांच्या मानवी हक्कावर झालेल्या अन्यायासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देवराज रामदास कांबळे व अमोल अरुण धेंडे हे कार्यकर्ते जनहितार्थ लोकशाहीच्या मार्गाने सुपे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार ( दि. ३१ ) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. 
         त्यांनी केलेल्या १४ मागण्या शासनाने मान्य कराव्यात अन्यथा त्यामध्ये दुरुस्ती तसेच काही बदल करावे अशी माहिती देवराम कांबळे व अमोल धेंडे यांनी केली आहे. या डिपी मुळे गावचा विकास आराखडा झाल्यावर अनेक नागरिक बेघर व भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे शासनाचे धोरण हे गोरगरीब नागरिकांचे मरण झाले आहे. येथील उपोषणाचा दुसरा दिवस असुन मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढे ग्रामस्थांच्यावतीने चक्री उपोषण सुरु होणार असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.
        ..............................
To Top