सुपे परगणा l सुप्यात आंबेडकर जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४  वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
         येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे, सरपंच तुषार हिरवे आणि उपसरपंच शंकर शेंडगे यांचे हस्ते आंबेडकर भवन येथे शुक्रवारी सकाळी प्रतिमेला पुष्पहार घालुन धम्म पुजा करण्यात आली. 
            मागिल चार दिवसापासुन येथील सिद्धार्थ तरुण मंडळाच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी मंगळवारी ( दि. १५ ) प्रा. अनिल पवार यांचे समाजसुधारकांची शिकवण आणि आजची तरुण पिढी या विषयावर व्याख्यान झाले. बुधवारी ( दि. १६ ) जगदिश गायकवाड ( पुणेकर ) यांचा भीम गीतांचा कार्यक्रम झाला. गुरुवारी ( दिं १७ ) प्रा. कविता म्हेत्रे यांचा ' मी सावित्री फुले बोलतेय ' हा एकपात्री नाट्यप्रयोग झाला. यावेळी प्रा. म्हात्रे यांनी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर ' मी सावित्री फुले बोलतेय ' हा एकपात्री नाट्यप्रयोगातुन त्यांनी या महामानवांचा जिवनपटच उलघडुन दाखवला. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुयश जगताप यांनी केले. उपस्थितीतांचे स्वागत सुशांत जगताप यांनी केले. तर आभार ॲड. गणेश धेंडे यांनी मानले. 
         शुक्रवारी ( दि. १८  ) संध्याकाळी आंबेडकर भवन येथुन रथात ठेवण्यात आलेल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून भव्य मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली. 
     यावेळी मिरवणूकीत डिजे, झांज पथक हलगी पथक सहभागी झाले होते. त्यानंतर वरची पेठ, खालची पेठ, बाजार मैदान आणि पुन्हा आंबेडकर भवन येथे मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी आंबेडकर भवन परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तर मिरवणुकीत जागोजागी रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक शांततेत आणि वेळेत पुर्ण करण्याकामी येथील सपोनी मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
       तर सोमवारी ( दि. २१ )  संध्याकाळी प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांचा विद्रोही कवितांचा कार्यक्रम होणार आहे. 
          _____________________
To Top