Mount Everest l पुरंदर तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर..! तालुक्यातील 'या' गावाच्या माजी सरपंचाने सर केला एव्हरेस्ट बेस् कॅम्प ट्रेक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पाच ते दहा मिनिटाला हवामानाचा बदल..150 किलोमीटर, 14 दिवस, उंची वाढेल तसे मळमळ डोकेदुकी असा समस्यांना तोंड देत पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावचे माजी सरपंच  सतिश शिंदे यांनी जागतिक सर्वोच्च शिखर असलेला एवरेस्ट बेस् कॅम्प ट्रेक पूर्ण केला.  
        सतिश शिंदे यांना जिम, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग फिटनेसची आवड असल्यामुळे तसेच गेल्या एक वर्षापासून सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन यामध्ये घाटवाटा व गड किल्ल्यांचे ट्रेकिंग करून सराव करता आला. कमी ऑक्सिजन मध्ये शारीरिक क्षमता टिकून राहण्यासाठी श्वसनाचे व्यायाम केले. एवरेस्ट बेस कॅम्प सर करणारे पुरंदर मधील सतिश शिंदे हे पहिलेच गिर्यारोहक आहेत. 
         सतिश शिंदे यांनी एव्हरेस्ट शिखर  ट्रेक करताना अंदाजे 150 किलोमीटर यानंतर चढणे-उतरणे असे करत 14 दिवसांचा वेळ हा ट्रेक पूर्ण केला.  यासाठी गेल्या एक वर्षापासून घेतलेली मेहनत व जिद्द व चिकाटीच्या जोरावर हा ट्रेक पूर्ण करून त्यांनी पुरंदरचे नाव जागतिक पातळीवरील पोचवले.
To Top