सुपे परगणा l सुप्यात भांड्याचे दुकान उचकटुन दिड लाखाच्या मालाची चोरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील एसटी बसस्थानकानजीक असलेल्या लोणकर हॉस्पीटल शेजारी कृष्णा स्टील सेंटर या भांड्याच्या दुकानाच्या पाठीमागिल पत्रा उचकटुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३५ हजार ७०० रुपयांच्या मालाची चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकिस आली.  
       पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी १० च्या दरम्यान दुकान बंद केल्यावर मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास दुकान उघडण्याकरीता गेले असता दुकानातील विविध वस्तुंची चोरी झाल्याचे उघडकिस आले. याबाबत गोपाळ पन्हाळे यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. 
         या दुकानातील बजाज नेक्सा, जिओ मिनी, जिओ टॉवर कंपनीचे कुलर, बजाज कंपनीचे सिलींग फॅन, मिक्सर, कुकर, तांब्याच्या कळश्या, पितळी धातुच्या घंट्या, सुर्या कंपनीच्या गॅस शेगड्या, देवपुजाचे तांब्याचे ताम्हण, मिलटॉन कंपनीचे डब्बे, बाटल्या, तांब्याचे तसेच पितळीची जुनी भांडी आदींसह रोख १० हजार ७०० रुपये मिळुन १ लाख ३५ हजार ७०० रुपयांच्या विविध मालाची चोरी झाल्याची माहिती फिर्यादी याने पोलिस स्टेशनला दिली.  
      दरम्यान येथील सपोनी मनोजकुमार नवसरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की चोरी झालेल्या ठिकानापासुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी करीत आहेत. 
           .........................................
To Top