Baramati News l प्राजक्ता पवार-यादव यांना पीएच.डी.पदवी प्रदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी 
 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी तालुका बारामती मध्ये हिंदी विषयाचे अध्यापन करीत असलेल्या प्राजक्ता अरविंद पवार यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त झाली आहे.
                 'समकालीन हिंदी उपन्यासों में किसानी समस्याओं का विश्लेषण (प्रातिनिधिक उपन्यासों के विशेष संदर्भ में)' हा त्यांच्या शोध प्रबंधाचा मुख्य विषय होता.  या संशोधन कार्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. बारामती व पंचक्रोशीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रस्तुत संशोधन कार्यासाठी तळेगाव ढमढेरे, ता.  शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या  साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर (डॉ.) मनोहर जमदाडे यांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले. प्राजक्ता पवार यांच्या  यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथील त्यांचे सहकारी बंधू भगिनी मुख्याध्यापक पर्यवेक्षक, वाणेवाडी येथील ग्रामस्थ तसेच विविध संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
..............................
To Top