सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
प्रत्येक मुला - मुलींनी आपल्या बापाला समजुन घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन समाज परिवर्तनकार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी केले.
सुपे येथे ' श्री भैरवनाथ यात्रा ' उत्सवाच्यानिमित्ताने ' बाप समजुन घेताना ' या विषयावर डॉ. हंकारे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद देव आणि गणेश ननवरे यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी उपस्थित होते.
आई आणि बापाविषयाची कृतज्ञता व्यक्त करताना हंकारे यांनी समाजसुधारक सावित्रीबाई, जिजाऊ, रमाई तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींची उदाहरणे दिली. यावेळी हंकारे यांनी त्यांच्या शैलीत उदाहरणे देत असताना उपस्थित महिलांच्या डोळ्यांना अश्रूंचा बांध फुटला होता. बाप काय असतो हा जीवनपट त्यांनी व्याख्यानाद्वारे सांगितला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहाजी कुंभार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे आणि डॉ. गणेश लोणकर यांनी केले.
............................