12th Hsc Result 2025 l बारामतीच्या पश्चिम भागात मुलींचीच बाजी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर विद्यालयाचा ९४.३२ टक्के निकाल लागला.
या विद्यालयातील रोहिणी सूर्यकांत भोसले हिने ७७.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तन्मय दत्तात्रय कर्चे याने ७४.५० टक्के गुण मिळवत द्वितीय आणि श्रेया शेखर गायकवाड हीने ७३.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. 
साक्षी गणेश ठोंबरे या विद्यार्थिनीने ६३.३३ टक्के गुणांसह मागासवर्गीयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सचिव भारत खोमणे आणि प्राचार्य प्रमोद जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
            वाघळवाडी येथील उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा विज्ञान शाखेचा निकाल ९२.८६ टक्के लागला. विज्ञान शाखेत सारिका धनाजी तोरवे आणि मोनाली लक्ष्मण मोटे या दोघी विद्यार्थिनींनी ६४.१७ टक्के समान गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. प्रजोली बबन गुजर हीने ६२.६७ टक्के गुणांसह द्वितीय आणि अश्विनी अनिल कारंडे हिने ६१.५ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेचा निकाल ९२.५९  टक्के लागला. वैष्णवी धोंडीबा केसकर हिने ७९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, सविता नामदेव माने हीने ७३.८३ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि नंदा पांडुरंग महानवर ही ने ७३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, संचालिका रोहिणी सावंत व मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे यांनी अभिनंदन केले. 
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला शाखेत किशोर पांडुरंग खाडे याने ६८.५० टक्के गुण मिळवत प्रथम, पूजा दशरथ पाटोळे हीने ६६.५० द्वितीय आणि कोमल चांगदेव  जगताप हीने ६६.३८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत संस्कृती विलास दोषी हीने ७३.३३ टक्के गुणासह प्रथम, ओमराज संदीप शिंदे याने ७२.३३ टक्के गुणासह द्वितीय आणि सुहानी संदीप चौधरी विनय ७१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेत श्रावणी संभाजी टिके हीने ७८.५० टक्के गुणांसह प्रथम, हर्षदा पोपट लांडगे आणि समृद्धी सचिन देशमुख या दोघींनी ६७.५० टक्के द्वितीय आणि अभिजीत विजय काकडे याने ६७ टक्के  गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले.
To Top