Indapur News l भिगवण पोलीस ठाण्याच्या दोन सहाय्यक फौजदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने 
इंदापूर तालुक्यातील भिगवन पोलीस स्टेशनचे दोन सहाय्यक फौजदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. 
        सहाय्यक फौजदार नाना वीर व विठ्ठल वारगड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. नाना वीर हे भिगवन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना हवालदार, त्यानंतर गोपनीय विभागाचे कामकाज त्यांनी पाहिले. त्यानंतर ते सहाय्यक फौजदार झाले होते. त्यानंतर काल महाराष्ट्र दिनी त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. तसेच विठ्ठल वारगड हे सुद्धा भिगवन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना सुरुवातीला ते सहाय्यक फौजदार झाले. त्यानंतर आज त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली. नाना वीर व विठ्ठल वारगड दोन्ही अधिकारी कार्यक्षम रित्या काम करतात. अत्यंत शांत, मनमिळाऊ व लोकांच्या अडचणी सोडवणारे दोन अधिकारी पोलीस उपनिरीक्षक झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अगदी पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर हवालदार, त्यानंतर सहाय्यक फौजदार व आता पोलीस उपनिरीक्षक असे पद मिळाल्याने नक्कीच त्यांच्या कार्याची दखल घेतली. हे यातून स्पष्ट होते. दोन्ही अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्याबद्दल अनेक गावचे सरपंच, पदाधिकारी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करीत आहेत व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत. याबाबत आम्ही पोलीस उपनिरीक्षक नाना वीर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, जनतेचे प्रेम, सर्वसामान्य नागरिकांना न्याय, कुठलीही व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये आली तर त्यांची विचारपूस व त्यांना न्याय देण्याची भूमिका हे कर्तव्य आम्ही पार पाडले. येथून पुढील काळात सुद्धा जनतेच्या रक्षणासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्यासाठी सदैव आम्ही तयार आहोत. भिगवण पोलीस स्टेशनच्या दोन सहाय्यक फौजदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी झालेली पदोन्नती नक्कीच गौरवस्पद आहे.
To Top