सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
२०२५-२६ गळीत हंगामासाठी साठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन ३३५० रुपये व पुढील प्रत्येक टक्यासाठी ३४६ रुपये FRP जाहीर करण्यात आली आहे.
सध्यातरी साखरेचा किमान दर (MSP) ३१०० रुपये प्रति क्विंटलच आहे. FRP ही MSP पेक्षा अधिकच वाढत चालली आहे म्हणून या बाबत साखर उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे आणि MSP वाढवण्याची मागणी केली जात आहे.
साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी MSP मधे वाढ होणे गरजेचे आहे. MSP वाढल्या नंतर शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी मदत होणार असून त्याच बरोबर साखर कारखाने आर्थिक रित्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. मागील १६ वर्षाचा विचार केला तर FRP मध्ये अनेकदा वाढ झाल्याचे दिसते पण MSP मध्ये अधिक ची वाढ झालेली दिसत नाही.
२००९-१० साली ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन १२९८ रुपये आणि त्या पुढील प्रत्येक टक्यासाठी १३७ रुपये FRP जाहीर करण्यात आली होती. २०२५-२६ साठी १०.२५ टक्के उताऱ्यासाठी प्रतिटन ३५५० रुपये व पुढील प्रत्येक टक्यासाठी ३४६ रुपये FRP जाहीर करण्यात आली.
२००९-१० साली साखरेचा किमान दर २५९६ प्रती क्विंटल होता.२०२५-२६ साठी साखरेचा किमान दर (MSP) ३१०० रुपये प्रति क्विंटलच आहे. मागील १६ वर्षांचा विचार केला तर FRP मधे प्रतिटन २२५२ रुपयांची वाढ झालेली दिसते आणि MSP मध्ये आज पर्यंत फक्त ५०४ रुपयांची वाढ झालेली दिसते.
FRP च्या तुलनेत MSP ची वाढ ही खूप कमी झाल्याचे दिसून येते त्याच बरोबर MSP पेक्षा FRP मध्ये ४५० रुपयांची अधिक वाढ झालेली दिसून येत आहे. केंद्र शासनाने या वेळी उसाचा प्रतिटन उत्पादन खर्च १७३० रुपये जमेला धरून FRP ठरवल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्या तुलनेत गेल्या १६ वर्षा मधे ऊस उत्पादन घेण्यामधे झालेली भरवी अशी वाढ दिसत आहे त्या तुलनेत केंद्र शासनाने MSP मध्ये वाढ केलेली दिसत नाही.
हंगामाच्या सुरुवातीला असणारा साखरेचा दर वर्षभर स्थिर राहत नाही. मागील दोन वर्षात साखरेचे दर हे MSP च्या आसपासच राहिलेले दिसतात.
----------------------
साखरेचे दर MSP च्या आसपासच राहिले तर याचा परिणाम साखर कारखान्यांना FRP देण्यावरही होत असतो. महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना शेतकऱ्यांची FRP ची रक्कम देणेही अवघड होते या करता MSP मध्ये भरीव वाढ होणे गरजेचे आहे.
ऋषिकेश गायकवाड
संचालक, सोमेश्वर कारखाना