Baramati Breaking l बारामती मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा : सर्पदंश झालेल्या महिलेला वेळत उपचार न मिळाल्याने मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील एका ४७ वर्षीय महिलेचा सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे बारामती मेडिकल कॉलेजला या महिलेला तब्बल दीड तास उपचार न मिळाल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. 
         कांताबाई शंकर नाळे रा. क-हावागज ता. बारामती या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. २६ रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील काम करत असताना या महिलेला सर्पदंश झाला. यानंतर या महिलेस  सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  मेडिकल कॉलेजला उपचारासाठी नेण्यात होते. मात्र त्या ठिकाणी वेळेत उपचार मिळाले नाहीत. सहा वाजता दवाखान्यात दाखल झाल्यानंतर मुख्य डॉक्टर आठ वाजता आले. आणि त्यानंतर त्यांनी आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बळी गेला आहे असा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय.
To Top