Baramati Breaking l पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या : बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मी सानिया कुरेशी हिच्याशी लग्न केले आहे. नवरा वारंवार इन्स्टाग्राम व व्हॅटस अपवर चॅटिंग करतो. त्यामुळे नवऱ्याच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळुन एका २२ वर्षीय विवाहतेने लोखंडी गाजला गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. 
          श्रेया शिवाजी देडे रा. मासाळवाडी ता. बारामती (लग्नापूर्वीचे नाव : श्रेया रामचंद्र जाधव, वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत श्रेया हिचा भाऊ प्रीतम रामचंद्र जाधव रा. शीरढोण ता. कोरेगाव जि सातारा याने वडगाव निंबाळकर पोलीसात फिर्यात दिली आहे. यावरून पती शिवाजी माणिक देडे रा. मासाळवाडी ता. बारामती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
         श्रेया हिने शिवाजी देडे याच्याशी नऊ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. परंतु विवाहानंतरही तो सानिया कुरेशी या मुलीशी लग्न केल्याचे सांगत तिला घरी घेवून आला. तसेच तिच्याशी इन्टाग्राम व व्हाटसअपवर चॅटींग केले. यामुळे पत्नी श्रेया हिने पतीला विचारणा केली, समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्याने तिचे न एकता तिलाच शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून अखेर श्रेया हिने शनिवारी (दि. २४) रोजी दुपारी राहत्या घरात लोखंडी अगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड अधिक तपास करत आहेत.
To Top