सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराजवळ मध्यरात्री झालेल्या एका थरारक अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनु गुरुवारी (मंगळवार, २५ मे २०२५) मध्यरात्रीच्या सुमारास गेवराई शहरानजीकच्या गढी पुलावर एका एसयूव्ही गाडीचा दुभाजकाला किरकोळ अपघात झाला. या अपघातात गाडीतील कोणालाही कोणतीही दुखापत झाली नव्हती. मात्र, दुभाजकात अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे हे सर्वजण खाली उतरले. ते गाडीच्या दुरुस्तीची किंवा तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करत असतानाच महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या धडकेने अक्षरशः हे सहाही जण चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
बाबअपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचानामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाही सुरू केली. या अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.