Baramati Breaking l तू मला सोडचिठ्ठी का देत नाही असे म्हणत नवऱ्याचा बायकोवर तलवारीने हल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
तू मला सोडचिठ्ठी का देत नाहीस असे म्हणत नवरा व त्याच्या दोन साथीदाराने पत्नीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. 
          याबाबत मोहिनी दिपक मदने रा. बजरंगवाडी-लाटे ता. बारामती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी पती दिपक जयसिंग मदने, गणेश जाधव व निगडे (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 
         याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडगाव निंबाळकर येथील खोमणेवस्ती येथे घडली. नवरा दिपक याने तू मला सोडचिठ्ठी का देत नाहीस, असे म्हणत मोहिनी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. नवऱ्याने शर्टात लपवून आणलेल्या तलवारीने हातावर मारले. तसेच गणेश जाधव याने काठीने मारहाण केली. तर निगडे याने मोहिनी यांच्या बहिण गौरी हिस शिवीगाळ तसेच दमदाटी करत मारहाण केली.
To Top