Velhe News l मिनल कांबळे l तालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक बसवा : मा. जि. प. सदस्य देशमाने यांची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टीम बसवण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी केली आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आले आहे. 
        या निवेदनात असे म्हटले आहे की शासकीय कार्यालय आठवड्यातून फक्त पाच दिवस भरविले जात असून कार्यालयाची वेळ सकाळी 9:45 ते सायंकाळी 6.15 पर्यंत आहे तरी देखील शासकीय कार्यालयात कोणतेही कर्मचारी वेळेत येत नाही त्यामुळे तालुक्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, तहसील कार्यालय पंचायत समिती ,कृषी विभाग कार्यालय कृषी कार्यालय मध्ये शेतकरी आपल्या विविध कामासाठी हेलपाटे मारत आहेत तहसील कार्यालयात उत्पन्नाचा दाखला,आदिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रेशन कार्ड संदर्भातील कामे सातबारा संदर्भात कामे यासाठी लोक येत असतात. परंतु कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नाहीत व शेतकऱ्यांना उडवा उडवी ची उत्तरे देत असून हेलपाटे मारायला लावत आहेत. कर्मचारी वेळेत उपस्थित न राहिल्याने लोकांची कामे प्रलंबित राहत आहेत त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टीम बसवणे गरजेचे आहे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी केली आहे या संदर्भातील निवेदन तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आले आहे.यावेळी आनंद देशमाने, विकास भिकुले ,विनोद दिघे ,रामभाऊ राजिवडे, प्रमोद भोरेकर ,शुभम बेलदरे ,आतिश चोर, आशिष वेग्रे,अंकुश शिंदे उपस्थित होते
To Top