Baramati News l पोटासाठी बीडवरून बारामतीत स्थलांतरीत झालेल्या दाम्पत्याच्या कष्टाला फळ : दगड फोडता फोडता वडार समाजातील बहीण-भावाने मिळवली खाकी वर्दी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी 
त्यांचे आई वडील मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील. घरात अठराविश्व दारिद्र्य. पोटाची खळगी भरण्यासाठी ते बारामतीत आले. पाईपलाइन खणण्याचे काम त्यांनी सुरू केले. मात्र त्यांच्या मेहनती मुलांनी कष्टाने खाकी वर्दी मिळवली आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले. 
       सोनाजी पवार व फुलाबाई पवार हे मूळचे बीड जिल्ह्यातील. सन १९९८ साली ते कामाच्या शोधात कोऱ्हाळे बुद्रुक येथे आले. लोकांच्या शेतात त्यांनी खणणी बांधणीची कामे सुरू केली. पहाटे उठून उन्ह पावसाची तमा न बाळगता त्यांनी कष्ट सुरूच ठेवले. सोनाजी व फुलाबाई हे अडाणी परंतू त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत मात्र कोणतीच कासार ठेवली नाही. त्यांची पूजा व अमोल कॉलेज शिकत आपल्या आई वडिलांना मदत करू लागले. पूजाने बारावी नंतर मेहनत करून सन २०२३ साली मुंबई पोलीस खात्यात खाकी वर्दी मिळवली. तर आपल्या बहिणीचा आदर्श ठेवत राहुलने कॉलेज शिकत, दगड फोडत मातीशी दोन हात करत पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली व अखेर त्यानेही या वर्षी पुणे पोलीस होण्याचा बहुमान मिळवला. 
            पूजा व राहुलच्या या यशानंतर पवार कुटुंबीय व कोऱ्हाळे बुद्रुक येथील ग्रामस्थ आनंदित झाले असून आमच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना सोनाजी व फुलाबाई पवार यांनी व्यक्त केली
 
To Top