सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
हडपसर-सासवड पालखी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यामध्ये दिवे घाटातील अवघड घाटमार्ग रुंद करण्यासाठी डोंगरफोड करावी लागत असून, यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. ब्लास्टिंगमुळे उडणारे दगड आणि मुरूम रस्त्यावर पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी दररोज दुपारी १२ ते ३ या वेळेत अर्धा तास हा घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.
यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि फुरसुंगी वाहतूक पोलिसांनी केले आहे. वाहनचालक आणि प्रवाशांनी या वेळेत हडपसर-सासवड मार्ग टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी विनंती पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने केली आहे. पर्यायी मार्गाचा वापर शक्य नसल्यास घाटाच्या वर किंवा खाली २० ते ३० मिनिटे थांबावे लागेल, याची नोंद घ्यावी. रस्ता रुंदीकरणाच्या या महत्त्वाच्या कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.