सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर आणि बारामती तालुक्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती येथील प्रशासकीय भवनात होत आहे. त्यामध्ये लासुर्णे, सणसर, उद्धट आणि अंथुर्णे या चार गटाची पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये उद्धट गटात चुरशीची लढत होत असून सर्व ठिकाणी जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आज सकाळी ९ वाजता बारामती येथील प्रशासकीय भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. ३८ टेबलवर दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीत लासुर्णे, सणसर, उद्धट आणि अंथुर्णे या चार गटाची मोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये जय भवानीमाता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. उद्धट गटात मात्र गणपत कदम आणि करण घोलप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास दाखवला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक गट नंबर एक आणि दोन पहिल्या फेरी अखेर झालेले मतदान
पृथ्वीराज जाचक 5418
शरद जामदार 4777
संजय निंबाळकर 2880
प्रताप पवार 2683
गट नंबर 2
रामचंद्र निंबाळकर 5016
शिवाजी निंबाळकर 4674
संग्राम निंबाळकर 3289
महादेव शिरसाट 2469
बाद मते 444
पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत गट क्रमांक एक आणि दोन मधून जय भवानी विकास पॅनलचे उमेदवार आघाडीवर
तिसऱ्या फेरी अखेर उमेदवारांना पडलेली मते गट क्रमांक तीन मधील उमेदवारांना पडलेली मते
गणपत कदम 4130
करण घोलप 4089
पृथ्वीराज घोलप 4562
तानाजी थोरात 2723