Velhe News l किल्ले राजगडावर शिवरायांचे स्मारक उभारावे : मनसेची आक्रमक भूमिका.. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत दिला आंदोलन करण्याचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील किल्ले राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे  स्मारक उभारावे व शिवप्रेमीवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन प्रांतधिकारी महेश हरिचंद्रे यांच्याकडे निवेदन देऊन केली असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिली आहे. 
              याबाबत दसवडकर म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आले आहे 
याबाबत निवेदनात असे म्हटले आहे कि किल्ले राजगडावर चौथरा व मेघडंबरी उभी करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमीनी उभा केला होता,याबाबत पुरातत्व विभाग,आणि प्रशासन यांच्याकडुन शिवप्रेमीवर गुन्हा दाखल करुन राजगडावरील पुतळा तेथुन हटविण्यात आला आहे, शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी  वापरलेले साहीत्य इतरत्र कच-यात टाकुन दिले असल्याने 
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यासारखे आहे.त्यामुळे शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असुन राजगड किल्ला म्हणजे फक्त किल्ला नाही तर हिंदवी स्वराज्या पहिला साक्षीदार आहे,राजगड हे शिवरायांचे स्वप्न साकारलेले स्थान आहे,या ऐत्याहासिक भुमिवर शिवाजी महाराजांचे काहीतरी कायमस्वरुपी गौरवचिन्ह उभे करावे ही शिवप्रेमीची इच्छा आहे.
            जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करणे गुन्हा असेल तर महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर उभी असलेली स्मारके अतिक्रमणे ही देखील गुन्हे आहेत.त्याच्यावरील देखील गुन्हे दाखल व्हायला हवे आहेत, शिवप्रेमीवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत,तसेच किल्ले राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे  स्मारक दि १९ जुन पर्यत उभे करावे. 
छत्रपती शिवाजी महाराजांचे  स्मारक उभे न केल्यास १९ जुन नंतर शिवप्रेमी किल्ले राजगडावर शिवाजी महाराजांचे  स्मारक उभे करतील, 
             मागण्या मान्य झाल्या नाहीतर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन तहसिल कार्यालयासमोर उपोषण व तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.असा
इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.प्रांतधिकारी महेश हरिचंद्रे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी तहसीलदार निवास ढाणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर,तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे,संघटक रविंद घाडगे,माजी सरपंच अशोक चोरघे,,विकास भिकुले, प्रमोद भोरेकर, अनंता आधवडे, भीमाजी देवगिरीकर, आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते 

To Top