Baramati News l दुचाकीला साईट न दिल्याच्या रागातुन एकास मारहाण : सुपे पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील वरच्या पेठेत स्कुटीला साईट न दिल्याच्या रागातुन एकास मारहाण झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 
             प्रतिक जगताप, आदीत्य जगताप, सम्यक धेंडे तर एक अनोळखी मित्र ( रा. सुपे, ता. बारामती ) असे चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीला कव्वालीचा कार्यक्रम पाहुन अक्षय तानाजी देवकुळे ( रा. सुपा ता. बारामती ) घरी निघाला होता. त्यावेळी त्याने समोरुन आलेल्या स्कुटी मोटार सायकलला साईट न दिल्याच्या रागातुन चौघांनी लाथाबुक्यांनी तसेच वीट आणि फरशीने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी ( दि. १७ ) रात्री दिडच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय याचा मेहुणा अविनाश शाहु आवळे ( वय ३२ व्यवसाय नोकरी रा. पुरंदर, ता. हवेली ) याने फिर्याद दिली आहे. यासंदर्भात सुपे पोलिस स्टेशनला चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस हवालदार साळुंके करीत आहेत. 
           ..............................
To Top