Baramati News l लहान मुलांच्या क्रिकेटच्या खेळण्यावरून शिवीगाळ व मारहाण : मासाळवाडीच्या सात जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मासाळवाडी ता. बारामती येथे लहान मुले क्रिकेट खेळत असताना घराच्या कंपाऊंडवरील दिवा फुटल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या शिवीगाळ व मारहाण प्रकरणी सात वडगाव निंबाळकर पोलीसात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
            याबाबत दोन्ही कुटुंबाकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून पोलिसांनी जयसिंग भिकू धायगुडे, किसाबाई जयसिंग धायगुडे, अंकुश मल्हारी धायगुडे, रंजना अंकुश धायगुडे, लक्ष्मीबाई मल्हारी धायगुडे, तसेच अंकुश धायगुडे यांची दोन मुले (नाव माहीत नाही) अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            दि. ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना मासाळवाडी याठिकाणी घडली. याबाबत दोन्ही कुटुंबियांना परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
To Top