Baramati News l बारामतीच्या पश्चिम भागात चार शाळांचे निकाल १०० टक्के : विद्या प्रतिष्ठानच्या आदित्य पंडीतला ९९.२० टक्के गुण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील चार शाळांचे निकाल १०० टक्के लागले असून विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कुलच्या (सीबीएसई) आदित्य पंडित या विद्यार्थ्यांने ९९.२० टक्के गुण संपादन केले. 
              सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कुलच्या (सीबीएसई) या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये आदित्य पंडित याने ९९.२० टक्के गुण मिळवीत पहिला क्रमांक पटकावला. तर वेदांती भोसले हिने ९८.८० व सौऱ्य जगताप याने ९६.४० टक्के गुण मिळवीत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. शाळेचे प्राचार्य सचिन पाठक यांनी अभिनंदन केले आहे. बा. सा. काकडे विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी-मुरूम आणि  उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा या विद्यालयांचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे सर्व विद्यालयात मुलींनीच बाजी मारली आहे. निंबुत येथील बा. सा. काकडे विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. सानिका लालासो बनसोडे हिने ९०.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मानसी संतोष माने हीने ८४ टक्के गुणांसह द्वितीय आणि रसिका राजेंद्र खुडे हीने ८३. ८०  टक्के गुणासह तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या उपाध्यक्षा सुप्रिया पाटील, सचिव मदन काकडे, ज्येष्ठ संचालक भीमराव बनसोडे, तसेच मुख्याध्यापिका दिपाली ननवरे यांनी अभिनंदन केले. 
          उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडीने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. आनंद सावंत याने ८८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सुवर्णा बरकडे हीने ८४.४० टक्के गुणांसह द्वितीय आणि तनुजा बरकडे हीने ८४.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. समर्थ ज्ञानपीठाचे अध्यक्ष  अजिंक्य सावंत, मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व भागशाळा मुरूम या दोन्ही विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. मुरूम विद्यालयात साक्षी अजित भोसले आणि तेजस ज्ञानेश्वर शिंदे या दोघांनीही ८९ टक्के समान गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तेजस उमेश भोई याने ८१ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि माजीद शेख याने ८०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. 
      सोरटेवाडी येथील माध्यमिक विद्यालय करंजे शाळेचा एकूण निकाल ९३.२२  टक्के लागला आहे. साक्षी फत्तेसिंग पवार हीने ९३.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. काजल दत्तात्रय कारंडे हीने ८७.८० टक्के गुणांसह द्वितीय आणि  सावरी तानाजी चव्हाण हीने ८७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक एस. एस. लकडे आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सोमेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वरनगर या विद्यालयाचा निकाल ९८.५५  टक्के लागला आहे. विजेता दत्तात्रय सोनवणे हिने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक  पटकावला. अनुष्का सचिन शिंदे हिने ९४.२० टक्के गुणांसह द्वितीय आणि सई रमेश गायकवाड हिने ९२.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सचिव भारत खोमणे, प्राचार्य पी. बी. जगताप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
To Top