पुरंदर l १४ मे रोजी किल्ले पुरंदरवर महाराष्ट्र शासन व पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने होणार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा, शिवपुत्र, स्वराज्यरक्षक दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र शासन व पुरंदर प्रतिष्ठान आयोजित भव्य सोहळ्याचे आयोजन किल्ले पुरंदर येथे करण्यात येत आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, अजोड पराक्रमी योद्धा आणि संस्कृत पंडित असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यासाठी हा सोहळा सकाळी नऊ वाजता  छत्रपती संभाजी हॉल, किल्ले पुरंदर येथे साजरा होणार आहे. 
           सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत सांस्कृतिक कार्यें व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, विद्यमान आमदार विजयबाप्पू शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, सरचिटणीस स्वराज्य सदस्य डॉ. धनंजय जाधव, पोलिस अधिक्षक पंकज देशमुख,  तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पर्यावरण शास्त्रज्ञ् डॉ. सचिन पुणेकर, मुख्य कार्येकारी अधिकारी गजानन पाटील, संचालक, संस्कृतिक कार्यें संचनालय अधिकारी विभीषण चौरे, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, महाराट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल राष्ट्रवादी काँग्रेस योगेश शेलार आदी शासकीय मान्यवर व पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे व सर्व शिवशंभु भक्त हे उपस्थित राहणार आहेत त्याच बरोबर.प्रशासकीय सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी व सर्व संघटनाचे प्रमुख व कार्येकर्ते उपस्थित राहणार आहेत. ऊपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होईल.
           छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन, ज्यामध्ये पारंपरिक वाद्यांचा समावेश असेल. ही मिरवणूक ऐतिहासिक वातावरणात किल्ल्याच्या परिसरात काढली जाईल. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म सोहळ्याचे स्मरण म्हणून पाळणा गीत सादर केले जाईल.तसेच शौर्यकथा आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानावर आधारित पोवाडे आणि व्याख्याने आयोजित केले आहे .
    छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांच्या कार्याला अधिक व्यापकता प्राप्त झाली आहे. या संदर्भांवर चर्चा  व संभाजी महाराजांनी १२० युद्धे लढून सर्व जिंकली आणि मुघल साम्राज्याला खड्ड्यात गाडले, यावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.तरुण पिढीला संभाजी महाराजांचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय योगदान समजावून सांगण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . 
पुरंदर प्रतिष्ठाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज विशेष कार्य गौरव  पुरस्कार, पर्यावरण सेवा पुरस्काराणे सन्मानित करण्यात येणार आहे. तर विविध संस्था, संघटनांच्या वतीने शस्त्रास्त्र प्रदर्शन, चित्तथiरारक आणि साहसी खेळांचे सादरीकरण करण्यात
येणार आहे. तर मंगळवारी संयकाळी नारायणपूर येथे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून मिरवणूक काढली व ज्योत नेहण्यास येणाऱ्या शिव भक्तांचे स्वागत करण्यात आले.
-------------------
बुलेटचे सायलेन्सर मधून फटाक्या सारखा आवाज काढणे, दुचाकीच्या सायलेन्सर काढून विविध कर्णकर्कश आवाज, रस्त्यावर लोखंडी कोयता, गज, स्टील पट्टीच्या सहाय्याने ठिणगी सदृश जाळ काढणे, मद्यपान  करून गाड्या चालविणा-यावर कारवाई करण्यात येणार असून छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध ऊपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहन सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले.
To Top