सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : निलेश काशीद
लोणंद - शिरवळ रोडवर लोणंदच्या एमआयडीसी नजीक मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक देवून झालेल्या अपघातामध्ये निलेश भालचंद्र गाढवे वय 35 रा लोणंद यांचा जागीच मृत्यु झाला . दुचाकीला धडक दिलेले अज्ञात वाहनासह चालक पळून गेला आहे .
लोणंद येथील निलेश भालचंद्र गाढवे हे मोटरसायकल क्रमांक MH11AR 5863 या दुचाकीवरून शिरवळ कडून लोणंदकडे येत असताना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलला एमआयडीसी नजीक लोणंदकडून शिरवळकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला .अपघात एवढा जोरदार होता की निलेश गाढवे यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक दिलेले समोरचे वाहनासह चालक फरार झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच निलेश गाढवे यांचा मित्रपरिवार व लोणंद पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले .पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी फलटण येथे पाठविण्यात आले. निलेश गाढवे चांगले हॅन्डबॉल खेळाडू होते. त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांचे मागे वडिल , आई , पत्नी , दोन मुली , भाऊ असा परिवार आहे .लोणंद पोलिसात या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनाचा शोध लोणंद पोलीस घेत आहेत .पुढील तपास सपोनि सुशील भोसले करीत आहेत .