सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी येथे एका भरधाव चारचाकी गाडीचा टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला असून याबाबत काल दि. १२ मे रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ शुभम हरीभाऊ जगताप रा. धायरी सिंहगड रोड बेनकर वस्ती रो हाउस नं 24 पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलीसात फिर्याद दिली आहे. या अपघातात मयुर हरीभाउ जगताप वय 25 वर्षे रा. धायरी सिंहगड रोड याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुर्टी गावाचे हददीत जय मल्हार ढाब्याचे जवळ फिर्यादी व मयत हे हयुंडाई वेरणा गाडी नं एम एच. 12 टी. के. 9217 ही वेगात असल्याने तीचा उजवा टायर फुटुन कंट्रोल न झालेने कारवरील ताबा सुटुन रोडचे उजव्या बाजूस खाली जावुन अपघात झाला आहे. अपघातात
मयुर जगताप यांचा मृत्यू झाला आहे.