सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपालिकेकडून शहरात केला जाणारा पाणीपुरवठा दोन दिवसापासून बंद असल्याने नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्यात नगरपालिका पाणीपुरवठ्याच्या तीनतेरा वाजल्याचे समोर आले आहे.
सद्या कडक उन्हाळा सुरू असताना नागरिकांना पाण्याची गैरसोय होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तर दोन दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी ज्यादाचे आर्थिक नुकसान करून घ्यावे लागत असल्याने नागरिक संतप्त झाल्याचे चित्र आहे.तात्काळ नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून भोर शहरात पाणी वितरण करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांना होत आहे.लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करणार असल्याचे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उमेश घाडगे यांनी सांगितले.