Dapoli News l पुण्याच्या २२ वर्षीय तरुणीचा आंजर्ले समुद्रात बुडून मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दापोली : प्रतिनिधी
तालुक्यातील आंजर्ले येथील केतकी बीच समोरील समुद्रात आज सायंकाळी पुण्यातील विश्रांतीवाडी येथील २२ वर्षीय एका पर्यटक तरुणीचा बुडून मुत्यू झाला. पुण्यावरून १२ जणांचा ग्रुप सुट्टी निमित्त याठिकाणी आला होता. 
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एक १२ जणांचा ग्रुप दापोली येथील आंजर्ले येथे पर्यटनासाठी निघाला. ते आंजर्ले येथील केतकी बीच रिसॉर्ट येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. यामध्ये ६ मुली व ६ मुले असा मित्रमंडळींचा ग्रुप होता. आज संध्याकाळी ४.३० च्या सुमारास हे १२ जण मित्रमंडळी पोहायला गेले होते. पोहता पोहता मोठी लाट आली त्यावेळी तन्वी नीलेश पारखी (वय २२, रा. विश्रांतीवाडी, पुणे) हिला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ती तिथेच बुडाली. दापोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
To Top