सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर रविवार दि. 11 रोजी रात्री साडेनऊ वाजता तरूणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वालेकरवाडी येथे १८ वर्षांच्या तरूची धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रसंगाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेय. पोलिसांकडून तात्काळ या प्रकाराचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवड शहरातील वालेकर वाडी येथे एका अठरा वर्षे तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. वालेकरवाडी येथील कृष्णाई नगरमध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोमल भरत जाधव या 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दुचाकी वाहनावर हेल्मेट घालून आलेल्या दोन आरोपींनी कोमल भरत जाधव हिच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. तरुणीचा खून करण्यासाठी आलेले दोन्ही आरोपी दुचाकीवरून कृष्णाई नगर परिसरात फिरतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पोलिसांकडून अज्ञात मारेकाराचा शोध घेतल जात आहे.