Phaltan News l धक्कादायक....! कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून पैसे ! पालकमंत्री लक्ष देऊन कारवाई करणार का ? साखरवाडी आरोग्य केंद्रातील प्रकार

Admin
4 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : गणेश पवार
साखरवाडी ता फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दि ११ रोजी फलटण तालुक्यातील विविध गावांमधून ४० हुन अधिक महिला या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन  शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या या महिलांमध्ये ज्यांची सिझर पद्धतीने प्रसूती झाली आहे अशा महिलांकडून प्रत्येक सिझर साठी १ हजार या 'दरानुसार' वैद्यकीय अधिकारी अनिल कदम या महाशयांनी पैसे घेतले.
            यामध्ये दोन प्रसूती सिझर असणाऱ्या महिलांकडून २ तर तीन प्रसूती सिझर झाले असणाऱ्या महिलांकडून ३ हजार रुपये सकाळी महिला रुग्णालयात दाखल झाल्या झाल्या आशा सेविकांच्या माध्यमातून घेतले हे हे पैसे कशासाठी त्याची पावती मिळणार का अशा मागणी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्यानंतर ते ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना द्यावे लागतात व त्याची कोणती पावती मिळत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले या धक्कादायक प्रकाराबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या प्रकारची चौकशी करून या अधिकाऱ्यावर कारवाई करणार हा प्रश आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य कुटुंब ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे  अशांसाठी शासनाच्या वतीने विविध उपचार, गोळ्या औषधे व  शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात त्यानुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते अधिकाधिक नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयात कराव्यात म्हणून शासन गाव पातळीवर विशेष प्रयत्नशील असते प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या आशा सेविका या गावामध्ये  दोन व अधिक अपत्य असणाऱ्या कुटुंबीयांचा सर्वे करून त्यांची माहिती घेऊन त्यांना शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे फायदे समजावून सांगत असतात त्याचाच परिपाक असा की सध्या कुटुंब नियोजनासाठी खाजगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च येत असल्यामुळे सर्वसामान्य व सधन कुटुंबातील महिलांचा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आयोजित असणाऱ्या कॅम्पमधून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी कल वाढलेला आहे मात्र संपूर्ण जिल्ह्यात अनिल कदम हे एकमेव अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करीत असल्याने ज्या महिलांची प्रसूती ही सिझर पद्धतीने  झाली आहे अशा महिलांच्या प्रत्येक प्रसूतीला प्रत्येकी १ हजार या दरानुसार मागील अनेक दिवसांपासून पैसे घेत आहेत हे हे पैसे अनिल कदम हे स्वतः न घेता भाषा सेविकांना अशा महिलांकडून तुम्हाला प्रत्येकी सिजर साठी हे पैसे द्यावे लागतील व ते पैसे नंतर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असे सांगितले जाते सकाळी महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जर आशा सेविकांकडे  पैसे दिले तरच त्या महिलांना भुलीचे इंजेक्शन दिले जाते अन्यथा अशा महिलांना ऑपरेशन साठी वेळ प्रसंगी टेबल वरून खाली उतरवण्याच्या सुद्धा घटना या आधी घडल्या असल्याचे एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक लोक उपयोगी निर्णय घेत आहे मात्र अशा अधिकाऱ्यांकडून गोरगरिबांचे जर शोषण करून अडवणूक होत असेल तर गोरगरिबांनी न्याय कुठे मागायचा असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे सातारा जिल्ह्याला एक पालकमंत्री व तीन मंत्री असे चार मंत्री आहेत चार मंत्री महोदय त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये चालणारा हा प्रकार याला आळा घालणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना यामुळे पडला आहे.
----–-–---------------
नजीकच्याच गावातील  एका महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला ३ हजार रुपये भरण्यास सांगितले मात्र ती महिला पैसे देऊ शकली नाही त्यामुळे तिची कुटुंब  नियोजनाची शस्त्रक्रिया या कॅम्पमध्ये झाली नाही है दुर्दैवी आहे
----------------------
या वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत आहे 'जर ते पैसे घेतात याची बातमी छापली तर ते या ठिकाणी परत कधीच कॅम्पला येणार नाहीत आणि ते जिल्ह्यात एकमेव असल्याने प्रशासनालाच त्यांची गरच आहे त्यांना नाही' असे एका कर्मचाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
-------------------------
या अधिकाऱ्यावर नक्की 'वरदहस्त' कोणाचा?
ज्या ठिकाणी या शस्त्रक्रियेचा कॅम्प असतो तेथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी सुद्धा या अधिकाऱ्यापुढे अक्षरशः हतबल आहेत.
To Top