Phaltan Breaking l देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला : ट्रॅव्हल्स-ट्रकच्या भीषण अपघात तीन ठार, फलटण तालुक्यातील सालपे येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : निलेश काशीद
 उज्जैन येथील देवदर्शनास चाललेल्या ट्रॅव्हल्सचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान बिरोबा मंदिर समोर सालपे तालुका फलटण येथे घडली.
      या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला  जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून समजली माहिती अशी, इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच ०४ सीपी २४५२ ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे चा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजू कडून सातारा कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 42 बीएफ 77 84 हा ट्रक सालपे येथील बिरोबा मंदिर समोरील रस्त्यावर एक वळणावर समोर आला अन भीषण अपघात झाला. 
          या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोणंद पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
To Top