Baramati Crime l चारचाकी गाडीच्या टपावर बसून रिल्स बनवणे पडले महागात : चौघांवर गुन्हा दाखल

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
चारचाकी गाडीच्या टपावर बसून  स्टटंबाजी करत रिल्स बनवणे तरुणांना चांगलेच महागात पडले असून वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

        याबाबत पोलिस अंमलदार आबा जाधव यांनी फिर्याद दिली. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी सुजल कैलास आगम, यश भानुदास दरेकर, किशोर उर्फ भावड्या हरीभाऊ आगम व अों कार राजेंद्र दरेकर सर्व  रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती अशी गुन्हा दाखल केला आहे. 
         याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. ९  रोजी दुपारच्या वेळेत वडगाव निंबाळकर बस स्थानकामधील मोकळ्या जागेत हे तरुण चारचाकी गाडीच्या टपावर बसून रिल्स बनवत होते त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सुजल याच्या ताब्यातील मोटार (एमएच-४२ बीएन-१२७४) अविचाराने, निष्काळपणाने चालवत स्वतः तसेच गाडीवर बसलेल्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. यश याने चालू गाडीच्या टपावर तर किशोर याने बाॅनेटच्या डाव्या बाजूस व अोंकार याने उजव्या बाजूस उभे राहत स्वतःसह इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण होईल असे कृत्य करत याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.
--------------------------------
To Top