Bhor News l भोरच्या हीर्डोस मावळात करंजगावच्या शिवारात अजगराच्या विळख्यात भेकराचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील जंगल परिसरातील करंजगाव ता.भोर येथे गा डोंगरावर अजगाराच्या विळख्याने भेकराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.१७ सकाळी अकराच्या घडली.ही घटना करंजगाव येथील शेतकरी धोंडिंबा मळेकर,संतोष मळेकर हे गावच्या हद्दीतील वडाचामाळ परिसरात शेतात जात असताना एका झुडपाशेजारी अजगाराने भेकराला विळखा घातलेले पाहिले. साधारण अजगाराची लांबी १५ फूट होती.
       तात्काळ घटनेच्या माहिती मिळतच जमलेल्या ग्रामस्थांनी वन विभागाला कळविले.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. दरम्यान ग्रामस्थांच्या आवाजाने विळख्यात व तोंडात पकडलेले भक्ष सोडून अजगर झाडा झुडपातून डोंगराकडे निघून गेला. मात्र, अजगाराच्या विळख्यात भेकराचा मृत्यू झाला. मृत भेकराची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर जंगलात निघून गेलेल्या अजगराचा वनविभागाचे कर्मचारी व सर्पमित्र यांच्याकडून शोध घेण्यात आला.परंतू चार वाजेपर्यंत अजगराचा शोध लागला नव्हता.पुढेही शोधकार्य सुरु होते.अजगर सापडल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी सांगितले.अजगराच्या चर्चेने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून अजगराला पकडण्याची मागणी होत आहे. घटनास्थळी वनविभागाचे वनपाल सुग्रीव मुंडे, वनरक्षक समीर जाधव, वनमजूर योगेश कुडले,सर्पमित्र तबरेज खान, धीरज भोंडवे, ग्रामस्थ शंकर मळेकर, प्रदीप मळेकर, विठ्ठल मळेकर, सुनिल मोरे, सुहास गायकवाड सह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
Tags
To Top