Jawali News l चिकन मालाच्या व्यवसायावरून केळघर घाटात एकावर खुनी हल्ला : मारहाण प्रकरणी विनोद तुपेसह तिघांवर मेढा पोलिसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
वाटंबे गावचे हद्दीत केळघर घाटात वळणावर या लाईनला चिकनचा माल टाकू नको म्हणून या कारणाने सिकंदर इस्माईल मोमीन वय 41 वर्ष रा. सातारा यास शिवीगाळ दमदाटी करून कोयता व दांडक्याने मारहाण केल्याचा गुन्हा विनोद तुपे याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
               याबाबत दिलेल्या माहितीनुसार सातारा महाबळेश्वर केळघर घाटामध्ये वळणावर वाटंबे गावचे हद्दीत सिकंदर इस्माईल मोमीन रा. चाफळ तालुका पाटण, सध्या रा. 109 रामलीला अपार्टमेंट बुधवार पेठ सातारा व त्याचा भाऊ मुसा यांची व विनोद तुपे रा. वडोली भिकेश्वर ता. कराड यासह इतर तीन साथीदारांनी तु या लाईनला चिकण माल द्यायचा नाही असे म्हणून दमदारी करीत कोयता व दांडग्याने मारहाण केली या बाबत सिंकदर मोमीन याने मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास सपोनि अश्विनी पाटील करीत आहेत.
To Top