Jawali News l जावली बॅकेला सलग तिसऱ्या वर्षी 'अ' वर्ग : नेत्यासह सभासदांकडून संचालक कर्मचाऱ्यांचे कौतुक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेची अर्थवाहीनी समजली जाणारी दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बॅकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. बॅकेने सलग तीन वर्षे " अ " वर्ग टिकविण्यात यश मिळावले. या यशाचे श्रेय बँकेच्या चेअरमन सह संचालक व कर्मचाऱ्यांना देवुन आ. शाशिकांत शिंदे, माजी आ . सदाशिव सपकाळ, माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे सह सभासदांनी कौतुक केले.
           दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बॅकेची ५२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा मुंबई येथिल डिसिल्वा हायस्कूल येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष स्थानी बॅकेचे चेअरमन विक्रम भिलारे, आ. शाशिकांत शिंदे, माजी आ . सदाशिव सपकाळ, माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, व्हाईस चेअमन चंद्रकांत दळवी, संचलक चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर, योगेश गोळे, अरुण सुर्वे, संतोष कळंबे, बाळासाहेब भालेघरे, अजित कळंबे, विश्वनाथ धनावडे, रामचंद्र चिकणे, गणेश भोसले, विजय कदम, चंद्रकांत गवळी, सौ. जयश्री मानकुमरे, सौ. उमिता रांजणे, एकनाथ ओंबळे, माजी संचालक हिंदूराव तरडे, आनंदराव सपकाळ तसेच दत्ता गावडे, संदिप परामणे, विजय शेलार, साधु चिकणे आदी उपस्थित होते.
          यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी बॅकेमध्ये एखादे काम चुकीचे चालले आहे अस दिसले तर त्यावर संचालकाने बोट ठेवले पाहिजे अन तस झाल नाही तर अशा संचालकाला बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची अन आमची आहे याची जाणीव करून देत सलग तीन वर्षे या सर्व मंडळींनी चांगले काम केले आहे त्यांचे प्रामाणिक पणे अभिनंदन करतो असे आ. शिंदे यांनी सांगीतले.
            तसेच ते पुढे म्हणाले बॅकेच्या प्रगतीसाठी एक संघ होवुन एकजुटीने काम करू आणि जावलीचे नाव कायम उज्वल करू असे सांगताना जावलीच्या नावाला पुसण्याच काम कोणी करू नये. हि वारकरी सांप्रदायिक महाराजांनी सर्वसामान्य जनतेसाठी उभी केलेली बॅक आहे याची आठवण आ. शिंदे यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले बॅकेच्या प्रगती साठी जशी आम्ही एकजुट दाखवू तसे बॅकेच्या चुकीच्या गोष्टींना प्रखर विरोध करू असेही सांगायला विसरले नाहीत.
           यावेळी माजी आ. सदाशिव भाऊ सपकाळ यांनी बॅकेने प्रतीवर्षी अ वर्ग प्राप्त करून बँकेला १० कोटीचा नफा मिळवून दिला. सर्व संचालक चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत याचे हे फळ आहे त्यामुळे सर्वांचे कौतुक व अभिनंदन करतो असे सांगीतले.
          यावेळी माजी जिप उपाध्यक्ष यांनी बॅक बिनविरोध करू जो विश्वास संचालक मंडळावर दाखविला तो सर्व संचालकांनी सार्थ करून दाखविला याचा सर्व सभासदांना अभिमान आहे. बॅकेचे चेअरमन विक्रम भिलारे यासह सर्वांनी चांगले काम करीत या वर्षी सभासदांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला हे ही कौतुकास्पद काम केले आहे असे मानकुमरे यांनी सांगितले.
             चेअरमन विक्रम भिलारे यांनी सर्व सहकारी संचालक व कर्मचारी वर्गाने दिलेल्या योगदानामुळे बॅकेला अ वर्ग मिळाला त्याचा आनंद होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आपण काम करीत असून पुढे १ एकहजार कोटीचा टप्पा पार करण्याचे उद्दीष्ट आमचे असून त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे भिलारे यांनी सांगितले.
       यावेळी  बॅकेचे सरव्यवस्थापक गोविंद जाधव यांनी अहवालाचे वाचन केले. संचालक विश्वनाथ धनावडे यांनी ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. चंद्रकांत गावडे यांनी सन २३ -२४ च्या लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवालाचे वाचन केले. जावली, वाई, महाबळेश्वर सह मुंबई मधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक योगेश गोळे यांनी सुत्रसंचालन व स्वागत केले तर एकनाथ ओंबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
To Top